delhi-first-case-world-one-kidney-and-lung-had-be-removed-due-black-fungus-202109.jpg | जगातील पहिलंच प्रकरण, ब्लॅक फंगसमुळे काढावे लागले दोन महत्वाचे पार्ट | belgaum news | belgavkar बेळगावकर

जगातील पहिलंच प्रकरण, ब्लॅक फंगसमुळे काढावे लागले दोन महत्वाचे पार्ट

belgavkar.com | belgaum | belgavkar

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना ब्लॅक फंगस आजाराला सामोरं जावं लागलं. या ब्लॅक फंगसमुळे काहींना आपला एक डोळा, काहींना दोन्ही डोळे तर गमवावे लागले. याशिवाय, या फंगसमुळे काही रुग्णांचा मृत्यूही झाला. पण, आता दिल्लीतील एका रुग्णालयातून एका धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ब्लॅक फंगसने ग्रस्त रुग्णाची एक किडनी आणि फुफ्फुसाचा काही भाग काढावा लागला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गाझियाबादचे रहिवासी 45 वर्षीय रणजीत कुमार यांना मागच्या महिन्यात म्यूकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) आजाराची लागण झाली होती. त्यांना तीव्र ताप आणि थुंकीत रक्त आल्याच्या तक्रारीनंतर दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. रुग्णालयात त्यांची सर्व तपासणी करण्यात आल्यावर त्यांना ब्लॅक फंगसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं.
सामान्यतः ब्लॅक फंगस डोळ्यांवर हल्ला करतो, पण रणजीत यांच्या केसमध्ये फंगस त्यांच्या डाव्या फुफ्फुस आणि उजव्या मूत्रपिंडात पसरलं होतं. तात्काळ ऑपरेशन न केल्यास त्यांच्या जीवाला धोका होता. त्यामुळे डॉक्टरांनी आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि 6 तासांच्या कठीण ऑपरेशननंतर त्यांची उजवी किडनी आणि फुफ्फुसाचा काही भाग काढून टाकला.