जगातील पहिलंच प्रकरण, ब्लॅक फंगसमुळे काढावे लागले दोन महत्वाचे पार्ट

जगातील पहिलंच प्रकरण, ब्लॅक फंगसमुळे काढावे लागले दोन महत्वाचे पार्ट

belgavkar.com | belgaum | belgavkar

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना ब्लॅक फंगस आजाराला सामोरं जावं लागलं. या ब्लॅक फंगसमुळे काहींना आपला एक डोळा, काहींना दोन्ही डोळे तर गमवावे लागले. याशिवाय, या फंगसमुळे काही रुग्णांचा मृत्यूही झाला. पण, आता दिल्लीतील एका रुग्णालयातून एका धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ब्लॅक फंगसने ग्रस्त रुग्णाची एक किडनी आणि फुफ्फुसाचा काही भाग काढावा लागला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गाझियाबादचे रहिवासी 45 वर्षीय रणजीत कुमार यांना मागच्या महिन्यात म्यूकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) आजाराची लागण झाली होती. त्यांना तीव्र ताप आणि थुंकीत रक्त आल्याच्या तक्रारीनंतर दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. रुग्णालयात त्यांची सर्व तपासणी करण्यात आल्यावर त्यांना ब्लॅक फंगसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं.
सामान्यतः ब्लॅक फंगस डोळ्यांवर हल्ला करतो, पण रणजीत यांच्या केसमध्ये फंगस त्यांच्या डाव्या फुफ्फुस आणि उजव्या मूत्रपिंडात पसरलं होतं. तात्काळ ऑपरेशन न केल्यास त्यांच्या जीवाला धोका होता. त्यामुळे डॉक्टरांनी आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि 6 तासांच्या कठीण ऑपरेशननंतर त्यांची उजवी किडनी आणि फुफ्फुसाचा काही भाग काढून टाकला.
जगातील पहिलेच प्रकरण : रुग्णालयातील यूरोलॉजी विभागाचे सल्लागार डॉ.मनू गुप्ता यांनी सांगितल्यानुसार, रणजीत यांचे हे ऑपरेशन अतिशय कठीण स्वरुपाचे होते. फंगस रणजीत यांच्या फुफ्फुस आणि मूत्रपिंडाच्या काही भागात पसरल्याने त्यांच्या जीवाला धोका होता. त्यांचा जीव वाचवण्यासाठी तात्काळ ऑपरेशन करणं गरजेचं होतं. किडनी आणि फुफ्फुसात फंगस झालेले रणजीत जगातील पहिलेच व्यक्ती आहेत. दरम्यान, यशस्वी ऑपरेशन झाल्यानंतर महिनाभर रुग्णालयात उपचार घेऊन रणजित यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

जगातील पहिलंच प्रकरण, ब्लॅक फंगसमुळे काढावे लागले दोन महत्वाचे पार्ट

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm