बेळगाव : फूड किट्स वितरणावरून गोंधळ; 5 जणांवर गुन्हा दाखल

बेळगाव : फूड किट्स वितरणावरून गोंधळ;
5 जणांवर गुन्हा दाखल

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कालबाह्य फूड किट्स (Expiry Food Kits) वितरणावरून शहापूर पोलिस ठाण्यापुढे सोमवारी चांगलाच राडा झाला. कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिसांना जाब विचारत कारवाईसाठी आग्रह धरला. शाब्दीक चकमक उडून पोलिस ठाण्यापुढे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, पोलिसांनी याची दखल घेऊन 5 जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कामगार कल्याण मंडळाने लॉकडाऊन दरम्यान बांधकाम कामगारांसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 2,500 रेशन किट पाठवल्या आहेत. कामगार विभागाचे अधिकारी किंवा आमदारांहस्ते किटचे वितरण केले जाणे नियमात असताना भाजप कार्यकर्त्यांकडून त्याचे वितरण सुरु आहे. पण, आहार किट्स मुदतबाह्य असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दोन महिन्यांपूर्वी बेळगावला आलेले आहार किट्स वाटप न करता एका गोदाममध्ये ठेवले होते. ते आता कार्यकर्त्यांकडून वितरित केले जात होते. सामाजिक कार्यकर्त्यांनी यासंदर्भात विचारपूस केल्यानंतर त्यांना धमकाविले. मारहाण, खोटा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला जात आहे, असा आरोप करून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनय नावलगट्टी व सरचिटणीस प्रदीप एम. जे., ॲड. आर. पी. पाटील आदींनी या संदर्भात पोलिसांकडे कारवाईची मागणी केल्यानंतर शाब्दीक चकमक वाढून चांगलाच वाद पेटला. काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. कोविड-19 दरम्यान बांधकाम कामगारांना आहार किट वितरणासाठी शासनाने आहार किट्सचे वितरण केले होते. 19 सप्टेंबर रोजी किट जनतेला वितरित केल्याचे आढळले. यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. बेकायदेशीर व कालबाह्य खाद्यपदार्थ वाटप करणाऱ्या भाजप कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांच्यावर कारवाईची मागणी कॉंग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे.
आहार किट्सचा विषयात उजेडात आणल्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्या सरला सातपुते यांच्यावर हल्ला व धमकाविण्याची घटना घडली आहे. यामुळे सरिता यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाच जणांच्या विरोधात शहापूर पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे. नारायण कामकर, प्रमोद कामकर, शंकर हुलीमणीसह इतर पाच ते सहा भाजप कार्यकत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सातपुते यांनी दिलेल्या फिर्यीदीत संशयित 19 सप्टेंबरला वडगाव चावडी गल्लीतील जिव्हेश्‍वर देवस्थान येथे कालबाह्य आहार किट्स वितरण करत असल्याचे कळाल्यानंतर तेथे व्हिडिओ चित्रण करण्यासाठी गेले होते. यावेळी मारबडव, शिवीगाळ संशयितांनी केली. हातातील मोबाईल काढून घेऊन त्यातील व्हिडिओ डिलीट केला आहे, असा आरोप तक्रारीत केला. यानुसार शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नोंद झाला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : फूड किट्स वितरणावरून गोंधळ; 5 जणांवर गुन्हा दाखल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm