बेळगाव गणपती विसर्जन; गुन्हा दाखल

बेळगाव गणपती विसर्जन;
गुन्हा दाखल

belgavkar.com | belgaum | belgavkar

सकाळी 6 वाजेपर्यंत मिरवणूक

बेळगाव : बेळगाव शहरात गणपती विसर्जनादिवशी कोरोना नियमावली तसेच नाईट कर्फ्यूचे उल्लंघन करीत गणेश विसर्जन मिरवणूक काढल्याप्रकरणी खडेबाजार व मार्केट पोलिसांनी शहरातील गणेशभक्तांविरोधात सुमोटो गुन्हा दाखल करून घेतला आहे. खडेबाजारचे पोलिस उपनिरीक्षक आर. बी. सौदागर व मार्केटचे पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर यांनी याबाबत फिर्याद दिली. कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्याने रात्री 9 वाजल्यानंतर संचारबंदी आहे. त्यानंतर सर्व प्रकारचे व्यवहार बंद करणे आवश्यक आहे. विनाकारण रस्त्यावर फिरण्यासही निर्बंध आहेत. त्यामुळे श्री गणेश विसर्जन रात्री नऊच्या आधी व साध्या पद्धतीने करण्यात यावे, असे आवाहन पोलिस खात्यातर्फे करण्यात आले होते.
सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांच्या केवळ दहा कार्यकर्त्यांनी विसर्जन करून घ्यावे, कोणत्याही प्रकारची वरून साउंड सिस्टिम लावण्यात येऊ नये, झांजपथक किंवा वाद्यांचा उपयोग केला जाऊ नये, सामाजिक अंतर पाळण्यात यावे, मास्कचा वापर करण्यात यावा अशा विविध नियम व अटी घालण्यात आल्या होत्या. पण, हे सर्व नियम पायदळी तुडवत गणेश विसर्जन सकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात आले. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर किंवा मास्कचा वापर करण्यात आला नव्हता. त्यामुळे नाईट कर्फ्यूचे उल्लंघन करण्यासह कोरोना नियमांचे पालन न केल्याने खडेबाजार व मार्केट पोलिसांनी शहरातील गणेशभक्तांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला. या प्रकरणी पोलिस निरीक्षक दिलीप निंबाळकर तपास करीत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव गणपती विसर्जन; गुन्हा दाखल
सकाळी 6 वाजेपर्यंत मिरवणूक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm