नरेंद्र गिरी महाराज मृत्यू; सुसाईड नोट, तिघांना घेतलं ताब्यात

नरेंद्र गिरी महाराज मृत्यू;
सुसाईड नोट, तिघांना घेतलं ताब्यात

belgavkar.com | belgaum | belgavkar

प्रयागराज : आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, खांबावर लटकलेला अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला आहे. सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसराला सील केलं आहे. घटनास्थळावरुन पोलिसांना 6-7 पानांची सुसाईड नोट मिळाली असून यात वादग्रस्त शिष्य आनंद गिरी यांचे नाव लिहिल्याचे स्पष्ट झाले आहे.  पोलिसांनी शिष्य आनंद गिरी यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यासोबतच, लेटे हनुमान मंदिराचे पुजारी आणि त्यांच्या मुलासही प्रयागराज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रयागराजच्या जॉर्ज टाऊनमध्ये याप्रकरणी आयपीसी 306 अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी 11.30 वाजता महंत नरेंद्र गिरी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. महंत नरेंद्र गिरी यांचा मठामध्येच मृत्यू झाला आहे. मठातील लोकांना त्यांची खोली आतून बंद असल्याची आढळली, त्यानंतर दार उघडले असता नरेंद्र गिरी यांचा मृतदेह खांबाला लटकलेला आढळला. दरम्यान, नरेंद्र गिरी यांच्या निधनाच्या वृत्ताने अयोध्येत शोककळा पसरली आहे. सपा नेते अखिलेश यादव यांनीही नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केलं आहे. दरम्यान, नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूची माहिती पसरताच घटनास्थळी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. पोलीस प्रत्येक अँगलने प्रकरणाचा तपास करणार आहेत.
महंत नरेंद्र गिरी बऱ्याच दिवसांपासून तणावाखाली होते, अशी माहिती मिळत आहे. नरेंद्र गिरी यांचे त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्याशी अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. त्यांनी आनंद गिरींना मठातून बाहेर केले होते. पण, त्यानंतर आनंद गिरी यांनी माफी मागितल्यानंतर वाद मिटला होता. पण, दोघांमध्ये काही कारणावरुन वाद सुरू होता, अशीही माहिती मिळत आहे. नरेंद्र गिरी हे मोठे महंत होते, कुंभमेळा असो, अयोध्येचं आंदोलन असो या सगळ्या हिंदुत्वाच्या लढाईत महंतजी पुढे असत. अनेकदा त्यांची आणि आमची भेट झाली आहे. त्यांचे आशीर्वाद हिंदुत्त्ववादी संघटना म्हणून शिवसेनेला अनेकदा मिळाले आहेत.
ज्या पद्धतीने त्यांच्या मृत्यूचं प्रकरण समोर आलं ते रहस्यमय आहे. नरेंद्र गिरी महाराजांचा मृत्यू हा रहस्यमय असून या घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करावी. कारण, ते मजबूत मनाचे होते, ते आत्महत्या करतील असे वाटत नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशात कोणीतरी हिंदुत्त्वाचा गळा घोटल्याचे दिसून येते. पालघरच्या साधूंवरील हत्येचा ज्याप्रमाणे नि:पक्षपातीपणे तपास झाला, त्याप्रमाणे हाही तपास व्हावा असेही राऊत यांनी म्हटले.  

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

नरेंद्र गिरी महाराज मृत्यू; सुसाईड नोट, तिघांना घेतलं ताब्यात

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm