कर्नाटक : भगवा ध्वज हटविल्याने आंदोलन

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक : जमखंडी येथील मुधोळ रोडजवळील साई मंदिर परिसरातील भगवा ध्वज वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी हटविल्याच्या निषेधार्थ हिंदू जागरण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून निदर्शने केली. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी साई मंदिर परिसरातील भगवा ध्वज का हटविला, याची विचारणा करण्यासाठी हिंदू संघटनेचे कार्यकर्ते कार्यालयात गेले असता अधिकारी गैरहजर होते तर कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निषेध करत कुडची रस्त्यावर रास्ता रोको सुरू केला.
पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलकांनी ऐकले नाही. त्यानंतर मोर्चा ए. जी. देसाई सर्कलकडे वळवून तेथे रास्ता रोको सुरू केला. डीवायएसपी एम. पांडुरंगय्या, सीपीआय आय. एम. मठपती, पीएसआय बसवराज कोण्णूर आदींनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. ध्वज पुन्हा लावण्यात आला नाही. तर पुन्हा मोठ्या संख्येने जमून साई मंदिर परिसरात भगवा ध्वज फडविणार असल्याचे आंदोलन प्रमुख शैलेश आपटे यांनी सांगितले.