macche-belgaum-fine-penalty-cigarette-tobacco-copta-belgaum-202109.jpg | बेळगाव : मच्छे परिसरात 48 दुकानदारांना दंड | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : मच्छे परिसरात 48 दुकानदारांना दंड

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : शाळा व कॉलेजपासून 100 मीटर परिसरात तसेच बंदी असलेला गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या 48 दुकानदारांची तपासणी केली. मच्छे परिसरात झालेल्या या तपासणीत या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. धुम्रपान व अन्य तंबाखूजन्य पदार्थ विरोधी कायदा 2003 अंतर्गत जिल्हा तंबाखू नियंत्रण विभागाने सोमवारी अचानक कारवाई केली.
यावेळी तंबाखूचे सेवन केल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजावून देण्यात आले. सार्वजनिक स्थळावर धुम्रपान करणे, तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री करणे, शिक्षण संस्थांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या विक्रीला कोट्पा-2003 नुसार बंदी आहे. मात्र, कायद्याचे उल्लंघन करण्याचे प्रकार घडत असतात. तंबाखूजन्य पदार्थांची जाहिराबाजी करणे, विक्री करणे, सार्वजनिक स्थळावर धुम्रपान करणे, शाळा व महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्रीला 'कोट्पा' (Cigarettes and Other Tobacco Products Act or COTPA 2003) अंतर्गत बंदी आहे.
मच्छे परिसरातील पानटपरी, किराणा स्टोअस, हॉटेलजवळील लहान दुकाने यांची तपासणी करून जेथे गुटखा, तंबाखू व सिगारेटची विक्री होते, त्याची पाहणी केली. ही दुकाने जर शाळा कॉलेजपासून 100 मीटर परिसरात असतील तर त्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली. जिल्हा दक्षता अधिकारी डॉ. बी. एन. तुक्कार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सल्लागार समितीच्या डॉ. श्वेता पाटील, सामाजिक कार्यकर्त्या कविता राजन्नवर, एम. एम. नायक, एम. एस. शिंदगी यांनी ही कारवाई केली. यावेळी वडगाव पोलिसांचेही सहकार्य घेण्यात आले.