बेळगाव : 5 एकरात मिनी विधानसौधचा आराखडा तयार;

बेळगाव : 5 एकरात मिनी विधानसौधचा आराखडा तयार;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. निपाणी : निपाणी येथे मिनी विधानसौध इमारत निर्मितीसाठी 5 एकर जागा मंजुरीनंतर सार्वजनिक बांधकाम (पीडब्ल्यूडी) खात्याने त्वरीत मिनी विधानसौध इमारतीचा नियोजित आराखडा बनविला आहे. शिवाय बनविलेला आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठवून दिला आहे. आता आराखड्याला शासनाच्या मंजुरीची प्रतिक्षा आहे. जागा मंजुरीनंतर इमारतीचा आराखडा तयार झाल्याने मिनी विधानसौध निर्मितीसाठी हालचालींनी वेग घेतल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
आराखड्याला मंजुरी मिळाल्यावर आणि जागेचा ताबा घेतल्यावर लवकरच इमारत निर्मितीच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. मिनी विधानसौधच्या निर्मितीला चालना मिळत असल्याने तालुका पातळीवरील सर्व खात्याची सरकारी कार्यालये आणि सेवा निपाणीत दाखल होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. येथे तालुका निर्मितीला तीन वर्षे लोटली आहेत. तरीही तहसील व तालुका पंचायत कार्यालय वगळता येथे अद्याप विविध खात्याची तालुका दर्जाची कार्यालये येणे आवश्यक आहे.
निपाणी तालुका होण्यापूर्वीची काही खात्याची कार्यालये येथे कार्यरत आहेत. अशा कार्यालयांना तालुका दर्जा मिळू शकतो, मात्र इमारतीसह मनुष्यबळ व अन्य मुलभूत सुविधेमुळे अशा कार्यालयांच्या विस्तारावर मर्यादा आल्या आहेत. एकाच छताखाली सर्व प्रशासकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी मिनी विधानसौध निर्मितीसाठी जागेच्या शोधात होते. त्यांनी एपीएमसी आवारातील जागा देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने मिनी विधानसौधसाठी जागा देण्याचे निर्देश निपाणी एपीएमसीला दिले आहेत. मिनी विधानसौधसह तालुका पंचायतीला 2 एकर 30 गुंठे जागा दिली जाणार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 5 एकरात मिनी विधानसौधचा आराखडा तयार;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm