belgaum-traffic-police-rto-checking-belgaum-one-arrested-202110.jpg | बेळगाव : आरटीओजवळ युवकाला अटक; पोलिसांशी हुज्जत अन् गोंधळ | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : आरटीओजवळ युवकाला अटक; पोलिसांशी हुज्जत अन् गोंधळ

belgavkar.com | belgaum | belgavkar

वाहतूक पोलिसांची कारवाई जोरात

बेळगाव शहरात एका युवकाला वाहतूक पोलिसांशी असभ्य वर्तन करत रस्ता अडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली आहे. आरटीओ सर्कलजवळ आज सकाळीच्या सुमारास ही घटना घडली. चौकात हेल्मेटची उत्तर वाहतूक पोलीस एएसआय आणि दोन पोलिसांकडून तपासणी करण्यात येत होती. तो दुचाकीवर हेल्मेटशिवाय प्रवास करत होता आणि पोलिसांनी त्याची चौकशी केली.
यावेळी दुचाकीस्वाराने पोलिसांशी अयोग्य कृत्य केले. तसेच पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. तसेच रस्ता अडवल्याने यावेळी वाहतूक कोंडी झाली होती. ही माहिती समोर येताच त्याला ताबडतोब पोलिसांनी ताब्यात घेतले आणि रिक्षात जबरदस्ती घालून नेले. घटनेनंतर काही वेळातच वाहतूक कोंडी झाली होती. याप्रकरणी पोलिस स्थानकात त्या युवकाची चौकशी सुरु आहे.
एका नाण्याची दूसरी बाजू : वाहतूक पोलिसांनी यावेळी युवकावर अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे युवकाने संबंधित पोलिसांना जाब विचारताच पोलिसांनी त्याला मारहाण केली. त्यामुळे पोलिसांच्या या दंडेल शाहीचा निषेध करत संबंधित युवकासह इतर वाहन चालकांनी आरटीओ सर्कल येथे रास्ता रोको केला. त्यामुळे काही वेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. संबंधित वाहतूक पोलिसांनी ही माहिती मार्केट पोलिसांना देताच मार्केट पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. व संबंधित दुचाकीस्वार युवकालाला बळजबरीने ऑटो रिक्षा मध्ये कोंबून पोलीस ठाण्यात नेण्यात आले.