सणासुदीच्या काळात भारतीय बाजारात सोन्याची मागणी देखील वाढत असते. कालच दसऱ्याच्या निमित्ताने भारतीयांनी सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी सोन्याच्या दरांमध्ये 700 रुपये प्रति तोळ्याहून अधिकची वाढ झाली होती. दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या दरांमध्ये फारसा बदल झालेला नसला तरी, काहीशी वाढ नक्कीच झालेली दिसून आली.
बेळगावातील सोन्याचे दर : 48,650 रुपये
कालच्या तुलनेत सोन्याच्या दरांमध्ये 150 हून अधिक रुपये प्रति तोळ्याची घसरण झाल्याचे दिसून आले आहे. चांदी 63230 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. दसऱ्यानंतर आता दिवाळीच्या मुहुर्तावर सोने खरेदीला वेग येणार आहे. त्यामुळे काही दिवस सोन्याच्या दरांमध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. आज मल्टिकमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली.