ridiculous-practical-why-eat-ice-cream-shashi-tharoor-tweet-idli-samber-photo-202110.jpg | हास्यास्पद पण 'व्यावहारिक'... ही ईडली-आईस्क्रीम खाल्लीय का? | belgaum news | belgavkar बेळगावकर

हास्यास्पद पण 'व्यावहारिक'... ही ईडली-आईस्क्रीम खाल्लीय का?

belgavkar.com | belgaum | belgavkar

भारतीय संस्कृती आणि प्रदेशानुसार सकाळच्या नाश्त्याचेही पदार्त भिन्न असतात. महाराष्ट्रात सकाळचा नाष्ता तसा पोहे, उपमा आणि शिरा असाच आहे. महाराष्ट्राबाहेरचा विचार केल्यास, दक्षिण भारतात सकाळचा नाश्ता हा बहुतांश इडली सांबर, उडीत वडा, डोसा, उताप्पा असाच असतो. तुम्ही उत्तरेकडे म्हणजे दिल्ली, पंजाबकडे गेल्यास तुम्हाला मुख्यत्वे पराठे हे सकाळच्या नाश्त्याला खायला मिळतील. तसं, पाहिल्यास आज सर्वच ठिकाणी हे सर्वच पदार्थ मिळतात.
दक्षिण भारतातील इडली ही देशभर पसरली आहे, उडपी हॉटेलच्या माध्यमातून, इडलीवाल्या अण्णांच्या गाडीतूनही इडली गावोगावी पोहोचलीय. विशेष म्हणजे या इडलीची चव आणि सांबर-चटणीची गोडी मराठीजनांच्याही जिभेवर रेंगाळते, म्हणून महाराष्ट्रातही दाक्षिणात्य पदार्थ आवडीने चाखले जातात. कर्नाटकाची राजधानी बंगळुरूतील एका हॉटेल व्यावसायिकाने हीच इडली वेगळ्या स्टाईलने ग्राहकांपुढे ठेवली आहे. आईस्क्रीमच्या आकारात काडीत ही इडली बनवून सांबर चटणी पुढ्यात आहे. हॉटेलमालकाची ही स्टाईल अनेकांना भावली आहे, त्यामुळेच सोशल मीडियावरुन या हॉटेलच्या ईडली स्टाईलचे फोटो शेअर करण्यात येत आहेत.
विशेष म्हणजे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरुर यांनाही ही स्टाईल भावली. म्हणूनच त्यांनी हा फोटो ट्विट करुन हे हास्यास्पद आहे, पण व्यवहारीकही तेवढचं असल्याचं त्यांनी म्हटलं.