बेळगाव : गोजगा गावासह बेळगाव तालुक्यातील 28 गावांचा समावेश 'BUDA' मध्ये

बेळगाव : गोजगा गावासह बेळगाव तालुक्यातील 28 गावांचा समावेश 'BUDA' मध्ये

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील गोजगा गावाचाही समावेश बुडा कार्यक्षेत्रात करण्याचा महत्त्वाचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे बुडा कार्यक्षेत्रात नव्याने समाविष्ट केल्या जाणार असलेल्या तालुक्यातील गावांची संख्या आता 28 झाली आहे. गतवर्षी 4 जुलैला झालेल्या बुडा बैठकीत बेळगाव तालुक्यातील 27 गावांचा समावेश कार्यक्षेत्रात करण्याचा निर्णय झाला होता. त्यात गोजगा गावचा समावेश नव्हता, पण जिल्हा पंचायतीने बुडाला पत्र पाठवून गोजगा गावचा समावेशही बुडा कार्यक्षेत्रात करण्याची शिफारस केली.
ही गावे होणार बुडा कार्यक्षेत्रात समाविष्ट
निलजी, मुतगा, सांबरा, शिंदोळी, बसरीकट्टी, बाळेकुंद्री बीके, बाळेकुंद्री केएच, होनीहाळ, माविनकट्टी, मास्तमर्डी, धामणे, येळ्ळूर, हट्टी, कुट्टलवाडी, नावगे, हंगरगा, मण्णूर, सुळगा, आंबेवाडी, गोजगा, कल्लेहोळ, होनगा, कडोली, अलतगा, जाफरवाडी, कलखांब, अष्टे, मुचंडी.


बुडाने 27 गावांचा प्रस्ताव गतवर्षीच शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्या प्रस्तावात असलेल्या काही त्रुटींमुळे तो परत पाठविण्यात आला. आता बुडाने त्यात गोजगा गावचा समावेश करून नवा प्रस्ताव तयार केला आहे. तो प्रस्ताव सोमवारी बुडाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यानुसार आता 28 गावांचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला जाणार आहे.
गतवर्षी 27 गावांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्यानंतर त्याला मोठा विरोध झाला होता. कडोली, येळ्ळूर ग्रामस्थांनी त्याविरोधात मोर्चाही काढला. आता नव्याने 28 गावांचा प्रस्ताव पाठविण्यात आल्यामुळे संबंधित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे. बेळगाव तालुक्यातील 27 गावे सध्या बुडा कार्यक्षेत्रात असून, शहरालगतच्या गावांचा त्यात समावेश आहे. 2019 मध्ये बुडाचे कार्यक्षेत्र वाढविण्याचा निर्णय झाला. त्यावेळी केवळ सांबरा हे गाव बुडा कार्यक्षेत्रात आणण्याबाबत बैठकीत चर्चा झाली होती. त्याला बुडाचे तत्कालीन प्रशासक आर. विशाल यांनी विरोध केला. शहराच्या 15 ते 20 किलोमीटर परिघातील सर्व गावे बुडा कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्याची सूचना त्यांनी बुडा बैठकीत दिली. त्यानुसार बुडाने 27 गावांच्या समावेशासह प्रस्ताव तयार केला. त्यात मण्णूर व आंबेवाडी या गावचा समावेश होता, पण गोजगा गावचा समावेश नव्हता. आता गोजगासह 28 गावांचा बुडा कार्यक्षेत्रात समावेश समावेश झाला तर तालुक्यातील 55 गावांवर बुडा प्रशासनाचे नियंत्रण राहणार आहे. तेथे बेकायदा ले - आऊट, लँड यूज बदल करता येणार नाहीत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : गोजगा गावासह बेळगाव तालुक्यातील 28 गावांचा समावेश 'BUDA' मध्ये

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm