बेळगाव शहरात व्हाईकल ड्रायव्हिंग टेस्ट ॲण्ड फिटनेस सेंटर; आरटीओ मॅन्युअल चाचणी बंद होणार

बेळगाव शहरात व्हाईकल ड्रायव्हिंग टेस्ट ॲण्ड फिटनेस सेंटर;
आरटीओ मॅन्युअल चाचणी बंद होणार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव शहरातील पहिल्या स्वयंचलीत वाहन चाचणी आणि तपासणी केंद्राची (व्हाईकल ड्रायव्हिंग टेस्ट ॲण्ड फिटनेस सेंटर स्थापना ऑटोनगरमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच केंद्राचा लोकार्पण सोहळा आयोजिला जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, मागील अडीच वर्षापासून केंद्राचे काम येथे सुरु होते. मात्र, यापूर्वी लॉकडाउनसह मनुष्यबळाच्या अभावामुळे काम रखडले होते. मात्र, अलीकडे स्थितीमध्ये सुधारणा झाली असून केंद्राचे काम पूर्ण केले.
नवीन अद्ययावत चाचणी केंद्रामुळे स्वयंचलित वाहन चाचणी प्रक्रिया सुरु होणार असून मॅन्युअल चाचणी बंद होणार आहे. या स्वरुपाचे केंद्र जिल्ह्यातील पहिले केंद्र ठरले आहे. वाहन चालक परवाना देताना कार्यक्षम व पारदर्शकता राखली जाणार आहे. नवीन प्रणालीत कोणत्याही स्वरुपाची मॅन्युअल छेडछाड होणार नसल्यामुळे पात्र व्यक्तींना वाहन चालक परवाना, फिटनेस प्रमाणपत्र मिळणार आहे. शिवाय ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट सेंटर नाविन्यपूर्ण ओव्हरहेड व्हिडिओ सेन्सर आधारित आहे.
लाईट मोटार व्हेईकल (LMV) चालक परवाना मिळवण्यासाठी उमेदवाराला ग्रेडियंट व पार्किंग ट्रॅकवर वाहन चालवावे लागणार आहे. या तंत्रज्ञानामध्ये स्वयंचलीत व्हिडिओ चित्रण व्यवस्था असल्यामुळे चाचणी घेताना त्याचे व्हिडिओही मिळणार आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग, गती यांचे विश्लेषण माध्यमातून केंद्रात मिळणार आहे. वेग, आवाज पातळी, चाकांचे आयुष्य, ब्रेक आणि हेडलाईटसारख्या विविध बाबींची माहिती चाचणीच्या माध्यमातून मिळू शकणार आहे. ऑटोनगर येथे या केंद्राची स्थापना करण्यासाठी परराज्यातील एका कंपनीच्या ठेकेदाराला ठेका दिला होता. कंपनीकडून सुमारे दोन वर्षात काम पूर्ण करून देण्याबाबत कळविले होते. मात्र, कोरोनामुळे काम रखडले. लॉकडाउनमुळे कामगारही मूळगावी परतल्यामुळे कामासाठी कामगार मिळत नव्हते. त्याचा फटका केंद्रातील विकासकामांना बसला. आता विलंबाने का होईना केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच लोकार्पण सोहळा आयोजित करण्याची तयारी सुरु झाली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव शहरात व्हाईकल ड्रायव्हिंग टेस्ट ॲण्ड फिटनेस सेंटर; आरटीओ मॅन्युअल चाचणी बंद होणार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm