बेळगाव : बुडा 'या' ठिकाणी उभारणार शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि कम्युनिटी सेंटर

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव शहरातील रामतीर्थनगर येथे असलेल्या कर्नाटक क्रिकेट स्टेडियमनजीक (KCA Stadium) बेळगाव शहर विकास प्राधिकरण (बुडा BUDA - Belgaum Urban Development Authority - बेळगाव नगर विकास प्राधिकरण) शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि कम्युनिटी सेंटरची उभारणी करणार असून त्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. रामतीर्थनगर येथील नियोजित शॉपिंग कॉम्प्लेक्स अर्थात व्यापारी संकुल स्कीम नं. 35 43 व 43ए मधील आरएस नं. 557 येथे बांधण्यात येणार आहे. हे संकुल बांधण्यासाठी सुमारे ₹ 2 कोटी 62 लाख 33 हजार रुपये खर्च येणार आहे.
व्यापारी संकुलातील दुकानांबाहेर फूड स्टॉल्ससाठी जागाही असणार आहे. याच ठिकाणी कम्युनिटी सेंटर अर्थात समुदाय भवनाची उभारणी केली जाणार असून त्यासाठी सुमारे ₹ 4 कोटी 37 लाख 31 हजार 240 रुपये खर्च अपेक्षित आहे. समुदाय भवनाला तळमजला, त्यावरील तळमजला आणि पहिला मजला असणार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : बुडा 'या' ठिकाणी उभारणार शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि कम्युनिटी सेंटर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm