बेळगाव शहरातील पहिले बहुउद्देशीय व्यापारी केंद्र

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : स्मार्टसिटी योजनेतून बेळगाव शहरातील पहिल्या बहुउद्देशीय व्यापारी केंद्राचे बांधकाम सुरु आहे. महापालिकेच्या टिळकवाडीतील मालकीच्या कलामंदिर जागेत हे व्यापारी केंद्र बांधले जाते. 46 कोटी 38 लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून, पीपीपी तत्त्वावर त्याची निर्मिती केली जात आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये या केंद्रांचे बांधकाम सुरू झाले असून 24 महिन्यांत ते काम पूर्ण होणे अपेक्षीत होते. मात्र, न्यायालयाची स्थगिती, कोरोना, लॉकडाउन व अन्य काही कारणांमुळे व्यापारी केंद्राचे बांधकाम रखडले आहे. या व्यापारी केंद्राच्या बांधकामासाठीची आर्थिक गुंतवणूक ठेकेदार कंपनीकडून केली जाणार आहे.
बेळगाव शहरात नव्या व्यापारी केंद्रांची निर्मिती करून बाजारपेठेचे विकेंद्रीकरण करण्याच्या उद्देशाने स्मार्ट सिटी विभागाने हा प्रकल्प हाती घेतला. शहरात आणखी दोन ठिकाणी अशा व्यापारी केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. धर्मनाथ सर्कल व महांतेशनगर येथे त्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. पण या दोन्ही व्यापारी केंद्रांसाठी स्मार्ट सिटी विभागाला ठेकेदार मिळालेला नाही. स्मार्टसिटी योजनेच्या कलामंदिरच्या आराखड्यात जागेत व्यापारी केंद्र बांधण्याचा निर्णय झाल्यानंतर 2019 मध्ये त्या जागेचे महापालिकेकडून स्मार्टसिटीकडे हस्तांतरण झाले.
त्यानंतर कलामंदिरची वास्तू पाडवून तेथे बांधकामाला सुरवातही झाली. या जागेत तळघरासह पाचमजली इमारत बांधली जाणार आहे. त्यात पहिल्या तीन मजल्यांवर मल्टीप्लेक्स, तिसऱ्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर व्यापारी आस्थापने, कार्यालये असणार आहेत. हॉकर्स झोनही तयार केला जाणार असून एकूण 8225 चौरस मीटर जागेत हे व्यापारी केंद्र होणार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव शहरातील पहिले बहुउद्देशीय व्यापारी केंद्र

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm