बेळगाव : कंग्राळी खुर्द परिसरातून वाहणार्या मार्कंडेय नदीमध्ये शिवमुद्रा ढोल ताशा पथक (कडोली) यांच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नदीमध्ये टाकलेल्या कचऱ्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी निर्माण झाली होती. नदीमधील कचरा बाजूला काढून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. मार्कंडेय नदीतील कचरा व त्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्याची मोहीम शिवमुद्रा ढोल ताशा पथक हे वर्षातून दोन वेळा राबविते.
मागील 5 वर्षापासून ही मोहीम चालू आहे. यांच्या कार्याचे संपूर्ण गावातून कौतुक होत आहे. यावेळी शिवमुद्रा ढोल ताशा पथकाचे सदस्य व कंग्राळी खुर्द गावातील ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.