बेळगाव : जगात भारी आपलं कोगनोळी...

belgavkar.com | belgaum | belgavkar

#OmicronVarient चा भारतात प्रवेश, सोशल मीडियावर मीम्सचा कहर

कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर दूधगंगा नदीवर असणारा कर्नाटक सरकारचा सीमा तपासणी नाका

बच्चनसाहेबांचा प्रश्न, जगातलं सर्वात मोठं कोव्हिड सेंटर कोणतं? उत्तर आहे 'कोगनोळी टोलनाका'... मीम्स होतायंत व्हायरल
Screenshot-2021-12-03-11-51-01-37-01
बेळगाव ता. निपाणी : बेळगावच्या कोनगोळी चेकपोस्टवर सुरु असलेली तपासणी आणि देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराच्या दोन रुग्णांची पुष्टी याबाबत इंटरनेटवर एकापेक्षा एक मीम्स व्हायरल होत आहेत. त्याचवेळी ट्विटरवर #OmicronVariant ट्रेंड करत आहे. ओमीक्रॉन विषाणू दक्षिण आफ्रिकेत आढळून आला आणि सिमावर्ती बेळगाव जिल्ह्यातील 23 चेकपोस्टवर आरटी-पीसीआर अहवालाची कडक तपासणी पुन्हा सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिक व छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांकडून पुन्हा कोरोनाची लाट येणार काय, पुन्हा लॉकडाऊन होणार का, अशी विचारणा केली जात आहे.
FB-IMG-1638512387415
बच्चनसाहेब विचारतायत... जगातलं सर्वात मोठं कोव्हिड टेस्टिंग सेंटर कोणतं? सोशल मीडियावर त्याचं उत्तर आहे कोगनोळी नाका. देशात कोरोनाची संख्या वाढली किंवा एखादा नवीन व्हायरस आढळला की चर्चेत येतो कोगनोळीचा चेक पोस्ट. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या या चेक पोस्टची धास्ती उत्तर भारतातील नागरिकांनी देखील घेतली आहे. हा चेक पोस्ट इतका चर्चेचा विषय का बनलाय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर या टोलनाक्यावर एकाहून एक भन्नाट मीम्स बनतायंत. RT-PCR तपासणीसाठी NH4 हायवेवरील कोगनोळी चेकपोस्टवर वाहनांच्या रांगा लागत असून वाहनधारकांसह प्रवाशांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे ओमीक्रॉन आफ्रिकेत आणि कडक तपासणी कोगनोळी नाक्यावर अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
FB-IMG-1638512362979