ATM मधून पैसे काढणाऱ्यांना नवा फटका; तुमचा उडेल रंग

belgavkar.com | belgaum | belgavkar

नव्या वर्षापासून म्हणजेच 1 जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढणं महागणार आहे. ज्यामुळं आता महागाईसोबतच हा नवा खर्चही सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे. जानेवारी महिन्याच्या 1 तारखेपासून ग्राहकांना या बदलाला सामोरं जावं लागणार आहे.  फ्री एटीएम ट्रांजॅक्शन लिमीट ओलांडल्यानंतर सध्याच्या तुलनेत ग्राहकांना आणखी शुल्क भरावं लागणार आहे. जून महिन्यात आरबीआयनं यासाठीची परवानगी दिली होती. काही दिवसांपूर्वीच ICICI बँकेनं हे शुल्क वाढवण्याचा मुद्दा प्रकाशात आणला होता आणि आता Axis बँकेनंही शुल्क वाढवण्याचा नियम जाहीर केला आहे. 
किती असेल शुल्क?  कोणत्याही बँकेतर्फे सध्या एटीएममधून पैसे काढतेवेळी कॅश अथवा नॉन कॅश व्यवहारासाठी 5 वेळेच्या वापराला पैसे आकारले जात नाहीत. यानंतर प्रत्येक वित्तीय व्यवहारासाठी 20 रुपये इतकं शुल्क आकारलं जातं.  1 जानेवारीपासून हे शुल्क  21 रुपये होणार आहे. मेट्रो शहरांमध्ये दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून 3 ट्रांझॅक्शन आणि नॉन मेट्रो शहरांमध्ये दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून 5 ट्रांझॅक्शन मोफत मिळत राहतील.  रिझर्व्ह बँकेनं यंदाच्याच वर्षी जून महिन्यात यासंदर्भातील पत्रक प्रसिद्ध केलं होतं. असं यासाठी करण्यात आलं आहे कारण इंटरचेंज फी आणि मिळकत वाढवण्यासाठी होणाऱ्या नुकसानापासून काहीसा आधार मिळावा यासाठी हा सारा घाट.