काय आहे ‘या’ Viral Video मागचे सत्य? हाच स्वर्ग अन् हीच आमची राजधानी… रायगडावरील मुसळधार ...

काय आहे ‘या’ Viral Video मागचे सत्य?
हाच स्वर्ग अन् हीच आमची राजधानी… रायगडावरील मुसळधार ...

belgavkar.com | belgaum | belgavkar

किल्ले रायगड आणि शिवछत्रपतींची मोहक मूर्ती;
रायगडवरच्या मुसळधार पावसाचा व्हिडीओ

भर पावसात शिवाजी महाराजांची पूजा केली कोणी...?

?
?

रायगडचं नाव उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येतो तो फक्त किल्लाच नव्हे तर मराठ्यांचा स्वाभिमानी, अभिमानी इतिहास आणि रयतेचा राजा... रायगड म्हणजे दुर्गदुर्गेश्वर, दुर्गराज. धुवांधार जलवर्षावात तर हा देखणा दुर्गराज पाहणे म्हणजे डोळ्याचे निव्वळ पारणे फेडण्याचा क्षण. असाच एक रायगडवरच्या पावसाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड (Raigad) किल्ल्यावरील एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं आहे. परंतु, या व्हिडीओमध्ये एक गोष्ट मात्र लोकांना आश्चर्य करून सोडत आहे. त्या आश्चर्यकारक गोष्टीमागचे रहस्य जाणून तुम्हालाही आनंद होईल आणि शिवरायांच्या या अनुयायांचा अभिमान वाटेल.
तर, वाचकहो तुम्ही या व्हिडीओमध्ये निरखून पाहिले तर भर पावसात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात असलेला अत्यंत ताजा पुष्पहार आपल्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गेले दोन दिवस पावसाने 1 मिनिट देखील विश्रांती घेतली नाहीये, तर मग जीवावर बेतणाऱ्या या पावसात शिवाजी महाराजांची ही पूजा केली कोणी? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. अनेकांना वाटत असेल, की ही पूजा गडाच्या आजूबाजूला राहणाऱ्या गावकऱ्यांनी केली असेल तर, त्याचे उत्तर आहे नाही. मग कोण? तर ते आहेत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे कार्यकर्ते. ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र धारकरी या नावाने ओळखतो. रायगड किल्ल्यावर रोज सकाळी सांगली येथून 2 धारकरी शिवाजी महाराजांच्या पूजेला जातात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात जो हार आहे, तो कधीच सुकत नाही. सांगलीहून 1992 पासून गेली 28 वर्षे रोज धारकरी रायगडावर एकही दिवस न चुकता शिवाजी महाराजांच्या पूजेला जातात. ही पूजा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा सर्वात प्रथम उपक्रम आहे.
जसा रायगड अखंडपणे ऊन वादळ वारा पाऊस झेलत इतिहासाचा वारसा घेऊन उभा आहे, तसाच हा वारसा जपण्यासाठी ऊन वारा पाऊस वादळ झेलत हे कार्यकर्ते रायगडावर रोज नित्यपूजा करतात. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ही पूजा कधीच चुकत नाही. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, की ही कल्पना कोणत्या व्यक्तीच्या डोक्यात आली? तर त्या व्यक्तीचे नाव आहे संभाजीराव भिडे. ज्यांना संपूर्ण जग भिडे गुरुजी या नावाने ओळखते. भिडे गुरुजींचा आदेश आहे, की रायगडावर कधीही महाराजांची पूजा चुकली नाही पाहिजे, त्याच आदेशाचे पालन करून आणि शिवाजी महाराजांवरील नितांत प्रेम आणि श्रद्धा असल्याने सांगलीहुन रोज पूजा करण्यासाठी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते रायगडावर हजर असतात.

रायगडमध्ये तुफान पाऊस, मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मनमोहक दृश्य कॅमेरात कैद, महाराष्ट्रातील सर्वाधिक व्हायरल होणारा व्हिडीओ #Raigad | #ShivajiMaharaj | #MaharashtraRain | #ViralVideo
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. रायगडावर देखील पावसाच्या जोरदार सरी आणि प्रचंड सोसाट्याचा वारा सुटला होता. रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करायला गेलेल्या शिवप्रेमीनं रायगडावरील ही दृश्य कॅमेरात टिपली आहेत. सध्या व्हाटसअ‌ॅप, फेसबूक, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल होतं आहे. अनेकांच्या व्हाटसअ‌ॅप स्टेटसला हाच व्हिडीओ पाहयाला मिळत आहे.


व्हिडीओत नेमकं काय? : महाराष्ट्रात कालपासून जोरदार पाऊस सुरु आहे. रायगड जिल्ह्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली. स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडावरील एक व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. प्रचंड सोसाट्याचा वारा आणि वरुन कोसळणाऱ्या पावसाच्या सरी या व्हिडीओत दिसून येत आहेत. या व्हिडीओत रायगडावरील राजसदरेवर पाऊस कैद झालेला आहे. राजसदरेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती अगदी मनमोहक दिसत आहे.
दे धक्का चित्रपटातील गीताचा वापर
छत्रपती शिवाजी महाराजांचा व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये 2008 साली प्रदर्शित झालेल्या दे धक्का चित्रपटातील वाट चालावी चालावी या गीताचा वापर करण्यात आला आहे. हे गीत सुप्रसिद्ध संगीतकार अजय- अतुल यांनी संगीतबद्ध केलं आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबरला रायगडला भेट देणार
खासदार संभाजी छत्रपती यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना रायगड भेटीचं निमंत्रण दिलं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संभाजी छत्रपती यांनी दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार केला आहे. राष्ट्रपती 7 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रायगडाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करणं ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे, असं खासदार संभाजी छत्रपती म्हणाले आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

काय आहे ‘या’ Viral Video मागचे सत्य? हाच स्वर्ग अन् हीच आमची राजधानी… रायगडावरील मुसळधार ...
किल्ले रायगड आणि शिवछत्रपतींची मोहक मूर्ती; रायगडवरच्या मुसळधार पावसाचा व्हिडीओ

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm