Video IND vs NZ, 2nd Test : विराट कोहली आला अन् गेला; मैदानावरील अम्पायरच्या निर्णयानं सारा गोंधळ झाला

Video IND vs NZ, 2nd Test : विराट कोहली आला अन् गेला;
मैदानावरील अम्पायरच्या निर्णयानं सारा गोंधळ झाला

belgavkar.com | belgaum | belgavkar

विराट कोहलीची विकेट मैदानावरील व तिसऱ्या अम्पायरनं मिळून ढापली?
;
भारताच्या कर्णधारानं नाराजी व्यक्त केली

India vs New Zealand, 2nd Test : मयांक अग्रवाल व शुबमन गिल यांनी टीम इंडियाला दमदार सुरूवात करून दिल्यानंतर न्यूझीलंडच्या अजाझ पटेल यानं सामनाच फिरवला. बिनबाद 80 धावांवरून टीम इंडियाची अवस्था 3 बाद 80 अशी केली. चेतेश्वर पुजाराला DRS मुळे जीवदान मिळूनही तो भोपळ्यावर बाद झाला. त्याच षटकात पटेलनं टीम इंडियाला मोठा धक्का दिला. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पहिलाच सामना खेळणाऱ्या विराटला भोपळ्यावर माघारी जावं लागलं. पण, त्याच्या या विकेटनं मोठा गोंधळ सुरू झाला आहे. विराटनं स्वतः डोक्यावर हात मारून घेतला. 
विराट कोहलीनं पुनरागमनाच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत मागील दोन दिवस सुरू असलेल्या पावसाच्या खेळीमुळे भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ 12 वाजता सुरू झाला. मयांक अग्रवाल व शुबमन गिल यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा संयमानं सामना करताना अर्धशतकी भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. 28 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पटेलनं टीम इंडियाला पहिला धक्का दिला. गिल 71 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारासह 44 धावांवर झेलबाद झाला. 
सातत्यानं अपयशी ठरत असलेल्या पुजाराकडे साऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. 30व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पुजारासाठी पटेलनं LBWची अपील केली. मैदानावरील पंचांनी नाबाद दिले आणि त्याविरोधात किवी खेळाडू तिसऱ्या अम्पायरकडे गेले. पण, त्यात पुजारा नाबाद असल्याचे स्पष्ट झाले अन् त्यांचा DRS वाया गेला. पण, पटेलनं टाकलेल्या पुढच्याच चेंडूवर पुजारानं पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पॅडला लागून यष्टिंवर आदळला. त्यानंतर त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर विराटसाठी LBWची जोरदार अपील झाली. मैदानावरील अम्पायर अनिल चौधरी यांनी विराटला बाद दिले. त्यानंतर विराटनं लगेच DRS घेतला.
टिव्ही अम्पायर वीरेंद्र शर्मा यांनी अनेक वेळा रिप्ले पाहिला आणि त्यांनाही चेंडू आधी पॅडला लागलाय की बॅटला हेच स्पष्ट दिसले नाही. त्यामुळे त्यांनी मैदानावरील अम्पायरचा निर्णय कायम राखताना विराटला बाद दिले. यावेळी वीरेंद्र शर्मा यांनी बॉल ट्रॅकींग डिव्हाईस न पाहताच विराटला बाद दिल्याचेही दिसले. खरंच चेंडू पहिला पॅडला लागला होता की नाही, यावरून वाद सुरू झालाय. विराटनंही या निर्णयाची दाद मागितली अन् पेव्हेलियनमध्ये जाऊन रिप्ले पाहून डोक्यावर हात मारला. भारतीय कर्णधार सर्वाधिक 6 वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम विराटनं नावावर करताना मन्सुर अली खान पतौडी (5) यांचा विक्रम मोडला.  

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

Video IND vs NZ, 2nd Test : विराट कोहली आला अन् गेला; मैदानावरील अम्पायरच्या निर्णयानं सारा गोंधळ झाला
विराट कोहलीची विकेट मैदानावरील व तिसऱ्या अम्पायरनं मिळून ढापली?; भारताच्या कर्णधारानं नाराजी व्यक्त केली

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm