कर्नाटकात नवीन नियमावली; पालकांनी 2 डोसची लस घेतली तरच शाळेत प्रवेश

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक : कर्नाटकात दोघांना ओमिक्रॉनची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मोठी बैठक बोलावली होती. बैठकीनंतर महसूल मंत्री आर अशोक यांनी नवीन नियमावली जाहीर केली. मंत्र्यांनी सरकारची तयारी आणि नवीन नियमांची माहिती दिली.
शाळा-कॉलेजांमध्ये समारंभासाठी आता परवानगी नाही.सिनेमा हॉल, मॉलमधील कर्मचारी आणि शाळकरी मुलांच्या पालकांना 2 डोस घेणे बंधनकारक आहे.शाळा-कॉलेजात जाणाऱ्या मुलांच्या पालकांनी दोन्ही डोस घेतला असेल तरच पालकांना शाळेत येण्यास परवानगी. अन्यथा पालकांना शाळेत प्रवेश दिला जाणार नाही, असे महसूल मंत्र्यांनी सांगितले.

केवळ 500 जणांना विवाह सोहळ्यास परवानगी