khanapur-mla-anjali-nimbalkar-bhaji-market-nandgad-khanapur-202112.jpg | बेळगाव : आमदार दिसल्या बाजारपेठेत | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : आमदार दिसल्या बाजारपेठेत

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. खानापूर : एरव्ही गृहिणीची भाजी घेण्यासाठी भाजी मार्केटमध्ये लगबग असते. मात्र एका आमदाराने चक्क भाजी विकत घेतली. या आमदार दुसर्‍या तिसर्‍या कुणी नसून, काँग्रेसच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर आहेत. आमदारांनी चक्क भाजी मार्केटमध्ये जाऊन भाजी खरेदी केली. आमदारबाई चक्क भाज्यांच्या किंमतीत बार्गेनिंक करताना दिसल्याची चर्चा आहे.
आमदार म्हणजे सभा, बैठका, दौरे आणि जंगी कार्यक्रमांचा रोजचा दिनक्रम ठरलेला. पण, या टिपिकल राजकारण्यांच्या वेळापत्रका पलीकडे प्रत्येक नेत्याचे स्वतःचे असे स्वतंत्र कौटुंबिक विश्व असते. साध्या साध्या गोष्टीत नेतेमंडळी आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात. आपल्या सरळ साध्या स्वभावाने जनतेच्या मनात घर करतात. याचाच प्रत्यय खानापूरच्या नंदगड आठवडी बाजारात आला.
आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी आठवडी बाजारात फेरफटका मारुन मध्यमवर्गीय गृहिणींप्रमाणे भाज्या आणि इतर सामग्रीची खरेदी केली. आमदार डॉ. अंजली निंबाळकर या स्वतः हातात पिशवी घेऊन भाजी विक्रेत्या महिलांकडून निवडून, पारखून भाज्यांची खरेदी करताना दिसून आल्या. फळभाजी घेत संपूर्ण बाजारपेठेत त्यांनी फेरफटका मारला. खरेदी करताना विक्रेत्यांच्या कुटुंबीयांची आणि व्यवसायाची त्यांनी आपुलकीने चौकशी केली.