कर्नाटक सरकारकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक सरकारने नव्याने गाईडलाइन्स जारी केल्या Omicron Variant

कर्नाटक : भारतात गुरुवारी कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रोनचे दोन रूग्ण कर्नाटकात आढळल्यानंतर देशाच्या चिंतेत भर पडली आहे. कर्नाटकात ओमिक्रोनचे रूग्ण आढळून आल्यानंतर कर्नाटक सरकारने नव्याने गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. यामध्ये ज्या नागरिकांचे पूर्ण लसीकरण झालेले नाही अशांना मॉल आणि सिनेमागृहांमध्ये प्रवेश दिला जाणार नाहीये. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली आज अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक झाली त्यानंतर नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
1. बैठकीला उपस्थित असलेले मंत्री आर. अशोक म्हणाले की, संपूर्ण लसीकरण केल्याशिवाय कोणालाही राज्यातील मॉल्स आणि सिनेमागृहांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
2. जोपर्यंत विद्यार्थांच्या पालकांचे पूर्ण लसीकरण होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळांमध्ये ऑफलाइन वर्गांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही. कोरोनाचा नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंट पाहता शाळा आणि महाविद्यालयांमधील सर्व सांस्कृतिक उपक्रम 15 जानेवारी 2022 पर्यंत पुढे ढकलण्यास सांगण्यात आले आहे.
3. राज्यातील विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोरोनाची चाचणी घेतली जाईल. प्रवाशांचे चाचणी अहवाल आल्यानंतरच त्यांना बाहेर पडण्याची परवानगी दिली जाणार आहे.
4. राज्यभरातील रुग्णालयांमध्ये पुन्हा एकदा कोविड बेड सुरू करण्यात येणार आहेत. तसेच यापूर्वी स्थापन केलेल्या समित्यांद्वारे ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवले जाईल आणि राज्यभरात कोविड नियंत्रण कक्ष पुन्हा सुरू केले जातील, असेही ते म्हणाले. कोविड औषधांचा तुटवडा नाही ना याची खात्री करण्यासाठी, लस आणि औषधे आगाऊ खरेदी केली जातील, असेही आर. अशोक यांनी सांगितले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कर्नाटक सरकारकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी
कर्नाटक सरकारने नव्याने गाईडलाइन्स जारी केल्या Omicron Variant

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm