belgaum-khanapur-bus-belgaum-khanapur-bus-heavy-rush-belgaum-knp.jpg | बेळगाव : तुफान गर्दी अन् आपला कंडक्टर लई भन्नाट हाय.... | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : तुफान गर्दी अन् आपला कंडक्टर लई भन्नाट हाय....

belgavkar.com | belgaum | belgavkar

तुफान व्हायरल व्हिडीओ... कोरोना चिरडून मेलायं

बस कंडक्टरची तिकीट काढण्यासाठी धडपड

बेळगाव : शाळा आणि महाविद्यालयांना येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसची कमतरता भासू लागली आहे. खानापूरकडून येणाऱ्या बस पूर्णपणे तुडुंब भरलेल्या असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना बससेवा उपलब्ध होत नाहीत. काही वेळा लोंबकळत प्रवास तर काही वेळा बस न थांबल्यास तसेच ताटकळत थांबण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
चालक आणि वाहक बस व्यवस्था अपुरी असल्यामुळे गैरसोय होत असून बस तुडूंब भरलेली असताना थांबवता येत नाही असे म्हणतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुफान गर्दी असलेल्या बसमध्ये बस कंडक्टर कशारितीने बसच्या एका सीटवरुन दुसर्‍या सीटवर जात आपली सेवा देत असतानाचा हा व्हिडीओ आहे.