बेळगाव : कोकटनूर यल्लम्मा देवीची यात्रा रद्द

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. अथणी : कर्नाटक-महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोकटनूर (ता. अथणी) येथील यल्लम्मा देवीची 29 डिसेंबर ते 4 जानेवारी अखेर होणारी यात्रा कोरोनामुळे बेळगाव जिल्हाधिकारयाच्या आदेशाप्रमाणे रद्द केल्याची माहिती तहसीलदार डाॅ. दुंडाप्पा कोमर यांनी दिली. यात्रेच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
पोलिस उपाधीक्षक एस. व्ही. गिरीश, मंडल पोलिस निरीक्षक शंकरगौडा बसगौडर, तालुका पंचायत अधिकारी शेखर करबसप्पगोळ उपस्थित होते. तहसीलदार कोमर म्हणाले, कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटमुळे यात्रा रद्द केली आहे. भक्तांना बाहेरून देवीचे दर्शन मिळेल. पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. बाहेरील नागरिकांना प्रवेश नसून दुकाने थाटण्यास बंदी आहे. भाविकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. यावेळी प्रभाकर चव्हाण, बाळासाहेब पुजारी, वीराण्णा वाली, ग्रामविकासाधिकारी जयपाल दुर्गण्णावर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.