बेळगाव : पहिल्या रेल्वे गेटजवळ रात्रीस अंधारात ठोकले

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव शहरातील पहिल्या रेल्वे गेटजवळ अंधाऱ्या जागेतील न दिसणाऱ्या दुभाजकाला आपटून एका कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी या कारमधून प्रवास करणाऱ्या कुटुंबाला याचा प्रचंड फटका बसला असून अशाप्रकारे चुकीच्या पद्धतीचे दुभाजक हटवण्याची मागणी होत आहे. शुक्रवारी रात्री हा अपघात घडला. सुदैवाने कोणालाही जखमा झाल्या नसल्या तरी कारच्या दर्शनी भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

#belgaum #belgavkar #belgav #बेळगाव
रेल्वे गेटजवळ अतिशय घाण झालेला हा दुभाजक रात्रीच्या वेळी दिसून येत नाही. त्यामुळे हा अपघात घडला असून कोणताही अंदाज येण्यापूर्वीच दुभाजकाला धडक दिल्यामुळे वाहन चालकाला ही त्याचा फटका बसला आहे. कारच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले असून अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आता प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.