shahapur-police-station-belgaum-missing-case-belgaum-belgav-202112.jpg | बेळगाव शहरातून बेपत्ता | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव शहरातून बेपत्ता

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : साईनगर, वडगाव येथून मॉर्निंग वॉकसाठी गेलेला वृद्ध बेपत्ता झाल्याची तक्रार शहापूर पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. पुंडलिक वासुदेव भंडारी (वय 66, रा. साईनगर, वडगाव, मूळचा गुरुवार पेठ, चन्नम्मा कित्तूर) असे बेपत्ता झालेल्याचे नाव आहे. भंडारी हे नेहमीप्रमाणे 27 नोव्हेंबर रोजी सकाळी फिरायला गेले होते. मात्र, ते घरी परतलेच नाहीत, अशी तक्रार मुलगा वामन भंडारी यांनी शहापूर पोलिस स्थानकात दाखल केली आहे.
पुंडलिक यांना कन्नड बोलता येते. त्यांची उंची 5.5 असून घरातून बाहेर पडताना त्यांनी निळ्या रंगाचा शर्ट, चॉकलेटी रंगाची पँट परिधान केली होती. त्यांच्याबाबत माहिती मिळाल्यास शहापूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.