बेळगाव : कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कर्जाची परफेड करता आली नसल्याने निराशेतून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना चंदनहोसूर येथे घडली. रमेश यल्लाप्पा तळवार (वय 46) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. अवकाळी पावसामुळे हातातोंडाला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. रमेश तळवार यांनी पीक घेण्यासाठी कर्ज घेतले होते. मात्र, अपेक्षेप्रमाणे उत्पादन निघाले नसल्याने कर्जाची परतफेड कशी करायची, या विवंचनेत ते होते. यामुळे निराश होऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
शेतवडीतील झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली आहे. घटनेची नोंद हिरेबागेवाडी पोलिस स्थानकात झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलिस निरीक्षक विजयकुमा शिन्नूर अधिक तपास करत आहेत.