Halaga-Machee-Bypass-Road-Belgaum.jpg | बेळगाव : हलगा-मच्छे बायपास; तोवर 'जैसे थे' परिस्थिती ठेवावी | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : हलगा-मच्छे बायपास; तोवर 'जैसे थे' परिस्थिती ठेवावी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : हलगा-मच्छे बायपासच्या अंतरिम अर्जावरील निकाल न्यायालयाने पुढे ढकलला असून, पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. अंतिम निकाल येईपर्यंत 'जैसे थे' परिस्थिती ठेवावी, अशी सूचना न्यायालयाने केली आहे. गत महिन्यात शेतकऱ्यांचा विरोध डावलून काम हाती घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल करीत कामाला स्थगिती मिळविली आहे. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाकडून कामावरील बंदी उठवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांकडून अनेक महिने काम बंद पडल्यामुळे महामार्ग प्राधिकरणाला मोठे नुकसान सहन करावे लागले. याची दखल घेऊन कामाला परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मात्र अँड. रविकुमार गोकाककर यांनी शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडली असून न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती दिली होती. मात्र, आतापर्यंत निकाल जाहीर केलेला नसून शुक्रवारी निकाल जाहीर होण्याची शक्यता होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष निकालाकडे लागून राहिले होते. मात्र, न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून याबाबत सोमवारी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
झिरो पॉइंट निश्चित करण्याबाबत शेतकऱ्यांनी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र याबाबत निकाल प्राधिकरणाकडून येण्यापूर्वीच पोलीस बांदोबस्तात काम सुरू केले होते. याला विरोध करीत शेतकऱ्याने याचिका दाखल केली आहे. तसेच शेतकऱ्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळेल, असे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत असून निकाल येईपर्यंत 'जैसे थे' परिस्थिती ठेवण्याची सूचना केली आहे. त्यामुळे निकाल लागेपर्यंत प्राधिकरणाला काम बंद ठेवावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.