कर्नाटकात ओमीक्रॉनचा शिरकाव झाल्यानंतर नवी नियमावली, पुन्हा काही निर्बंध

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटकात ओमीक्रॉनचा (Omicron) शिरकाव झाल्यानंतर आता सरकार आणि यंत्रणा सतर्क झाली आहे. ओमीक्रॉनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. या बैठकीत ओमीक्रॉनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विचारविनिमय करून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
आता असे असतील नियम
विवाह, संमेलने आदी कार्यक्रमासाठी केवळ 500 व्यक्तींना कोविड नियमावलीचे पालन करून उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
केवळ दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच मॉल, चित्रपटगृहात प्रवेश दिला जाणार आहे.
राज्यातील सगळ्या विमानतळावर प्रवाशांचे टेस्टिंग करण्यात येणार आहे.
रात्रीचा कर्फ्यु असणार नाही.
शैक्षणिक संस्थातील सांस्कृतिक कार्यक्रमावर 15 जानेवारी 2022 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
शाळेला जाणाऱ्या 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या पालकांनी दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे.
आरोग्य खात्यात सेवा बजावणाऱ्या आणि 65 वर्षांवरील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.
सरकारी  कर्मचाऱ्यांना देखील दोन डोस घेणे बंधनकारक आहे.
प्रत्येकाने मास्क वापरणे आवश्यक.
मास्क वापरला नाही तर नगरपालिका,महानगरपालिका हद्दीतील व्यक्तींना 250 रू तर ग्रामीण भागातील व्यक्तींना 100 रू दंड करण्यात येणार आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहन आणि प्रवाशांची तपासणी करून आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र असेल तरच प्रवेश दिला जाणार आहे. सीमेवरील चेकपोस्टवर आरोग्य, महसूल आणि पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांना चोवीस तास वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कर्नाटकात ओमीक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी दक्षिण आफ्रिकेतून आलेला रुग्ण दुबईला पसार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एक जण 66 वर्षीय असून दक्षिण आफ्रिकेतून आल्यानंतर ते पॉझिटिव्ह आढळले. त्यांना कोणतीही लक्षणं नव्हती. त्यांना विलगीकरणात राहण्यास सांगितले. पण जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल येण्याआधीच खासगी प्रयोगशाळेकडून निगेटिव्ह कोरोना अहवाल घेऊन आठवडाभरापूर्वी ते दुबईला गेले.