बेळगावात भारत-जपान संयुक्त लष्करी सराव फेब्रुवारी महिन्यात

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : भारत-जपान संयुक्त लष्करी कवायतीची तिसरी आवृत्ती असणारे संयुक्त लष्करी सराव फेब्रुवारी 2022 मध्ये बेळगावात होणार आहे. भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत जपानी लष्कराच्या शिष्टमंडळाने येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटरला नुकतीच भेट देऊन लष्करी सराव आयोजन संबंधीची माहिती घेतली आहे.
भारताकडून मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या राष्ट्रांशी दरवर्षी संयुक्त लष्करी सरावचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून जपानच्या लष्करासोबत भारतीय लष्कर संयुक्त सराव करीत असून बेळगावात पुढील वर्षी 27 फेब्रुवारीचे 12 मार्चपर्यंत मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल केंद्रात दोन्ही देशांचा संयुक्त लष्करी सराव होणार आहे. या संयुक्त लष्करी सरावाला धर्म गार्डियन असे नाव देण्यात आले आहे.