news.jpg | भीमाकाठावर पुन्हा रक्तपात; ग्राम पंचायतीच्या माजी सदस्याचा निर्घृण खून; तिघांना अटक | belgaum news | belgavkar बेळगावकर

भीमाकाठावर पुन्हा रक्तपात; ग्राम पंचायतीच्या माजी सदस्याचा निर्घृण खून; तिघांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक - विजापूर : भीमाकाठ परिसरात पुन्हा एकदा रक्तपात घडला असून आलमेल येथे ग्राम पंचायतीच्या माजी सदस्याचा गुरुवारी रात्री निर्घृण खून करण्यात आला आहे. आलमेल ग्राम पंचायतीचे माजी सदस्य प्रदीप एंटमान यांच्यावर काठ्या, दगडांनी हल्ला करून खून करण्यात आला. शार्पशूटर म्हणून ओळखला जाणारा प्रदीप गुरुवारी रात्री एक कार्यक्रम संपवून परत येत असताना त्याचावर चार-पाच जणांनी काठ्या, दगडांनी हल्ला केला. यात प्रदीपचा जागीच मृत्यु झाला.
याप्रकरणी तिघांना अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख आनंदकुमार यांनी दिली. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना जिल्हा पोलिस प्रमुख आनंदकुमार म्हणाले, याप्रकरणी 13 जणांविरुध्द आलमेल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यापैकी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू असून इतरांचा शोध सुरु आहे. राजकीय द्वेषातून हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रदीप हा आगामी ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत आलमेल ग्राम पंचायतीच्या वॉड 17 मधून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी करत होता, असे समजते.