बेळगाव : मानव बंधुत्व वेदिकेच्यावतीने आयोजित कार्यक्रमाचे नेतृत्व युवा नेते राहुल सतीश जारकीहोळी करणार आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात दरवर्षी येथील सदाशिवनगर स्मशानभूमीत एक दिवस वास्तव्य भोजन-सत्कार समारंभ तसेच मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
गेल्या सात ते आठ वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन आमदार सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत होते. मात्र आता सतीश जारकीहोळी विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारात गुंतल्याने त्यांचा हा वसा पुढे नेण्याचे कार्य त्यांचे चिरंजीव राहुल जारकीहोळी यांनी हाती घेतला आहे.
सदर कार्यक्रम 6 डिसेंबर रोजी सदाशिवनगर स्मशानभूमीत पार पडणार असून या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला घरबसल्या पाहता येणार आहे, असे मानव बंधुत्व वेदिके राज्य निमंत्रक रवींद्र नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.