बेळगाव : खानापूर ब्रिजजवळ अपघातात तरुणांनी वाचवले जखमीचे प्राण

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव - खानापूर : खानापूर शहरातील रेल्वे ब्रिजजवळील अपघातात जखमी झालेल्याचे प्राण तरुणांनी वाचविल्याची घटना रविवारी घडली. अपघातग्रस्ताला वेळीच शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, हल्याळमधील एकजण आपल्या पाच वर्षाच्या मुलासह दुचाकीने बेळगावच्या दिशेने चालला होता. रेल्वे ओव्हरब्रिजजवळ अज्ञात वाहनाने त्यांत्या दुचाकीला ठोकरले. तो इसम रस्त्याकडेच्या झाडीत फेकला गेल्याने ये-जा करणाऱ्यांना दुचाकी व तो इसम दिसत नव्हता.

त्याच्या शेजारी त्याचा लहान मुलगा रडत थांबल्याचे येथील भाजपचे कार्यकर्ते पंडित ओगले यांच्या निदर्शनास आले. त्याचवेळी बैलहोंगलचे पोलीस उपाधीक्षक शिवानंद कटगी तिथून जात होती. तेसुद्धा घटनास्थळी आले. श्री. ओगले यांनी इतर कार्यकर्त्यांना बोलावून जखमीला जखमीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. तसेच लहान मुलाला धीर दिला. वेळीच रुग्णालयात नेल्याने अपघातग्रस्ताचा जीव वाचला. या कार्यात महादेव काद्रोळकर, अनंत सडेकर, प्रदीप देसाई, केतन पत्री यांनी सहभाग घेतला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : खानापूर ब्रिजजवळ अपघातात तरुणांनी वाचवले जखमीचे प्राण

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm