बेळगावसाठी ₹ 184.28 कोटी रुपये

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : अमृत योजनेअंतर्गत बेळगाव शहरातील सांडपाणी व्यवस्था वगळता उर्वरित सर्व विकासकामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती गृहनिर्माण आणि शहरी विकास खात्याचे राज्यमंत्री कुशल किशोर यांनी दिली. राज्यसभेमध्ये बेळगावचे खासदार इरण्णा कडाडी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. बेळगाव शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 17.22 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून प्रगती 100 टक्के आहे. शहराच्या सांडपाणी प्रकल्पावर 162.73 कोटी रुपये खर्च झाले असून प्रगती 36 टक्के आहे.
एसपीएम रोडवरील शिवाजी उद्यानाची सुधारणा करण्यात आली आहे. यासाठी ₹ 50 लाख रुपये खर्च झाला असल्याचेही मंत्री किशोर यांनी सांगितले. हनुमाननगर येथील हरित जागा सुधारणा प्रकल्पासाठी 2.5 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे शिवाजीनगर येथील उद्यानावर 1.33 कोटी रुपये खर्च झाले आहेत. यापध्दतीने एकूण बेळगाव शहरात 184.28 कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प राबविण्यात आले आहेत, असेही मंत्री किशोर यांनी स्पष्ट केले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावसाठी ₹ 184.28 कोटी रुपये

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm