बेळगावात अधिवेशन येता शहरात तोची दिवाळी अन् दसरा...

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगावात 13 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन होणार

बेळगाव : कर्नाटकाचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावात घेण्याची योजना सरकारने आखली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहराच्या रंगरंगोटीचे काम सुरू झाले आहे. इतके दिवस दुर्लक्षित राहिलेल्या शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर आता स्वच्छता मोहिम तसेच डागडुजीची कामे गतिमान झाली आहेत.

#belgaum #belgavkar #belgav #बेळगाव
बेळगाव शहरात विविध ठिकाणी महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीचे कर्मचारी काम करताना दिसू लागले आहेत. त्यामुळे नागरिकातून अधिवेशन नियमित स्वरूपात व्हावे की काय अशी प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे. शहरात अवकाळी पावसामुळे झालेल्या शहराची दुर्दशा नागरिकांना त्रास त्रासदायक ठरत होती. मात्र सरकारी यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष केले होते. अधिवेशनाच्या निमित्ताने मंत्री महोदय आणि मान्यवरांचीही वर्दळ बेळगावातील रस्त्यांवरून वाढणार आहे, त्यामुळे आता रस्त्यांची दुरुस्ती पथदीप दुरुस्ती त्याचप्रमाणे इतर कामे उरकून घेण्याचे सत्र सुरू झाले आहे. शहर परिसरात आता स्वच्छता मोहीम देखील गतिमान झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकातून आश्चर्य व्यक्त होत आहे.
आगामी 13 डिसेंबर पासून बेळगावात अधिवेशन होणारचं सगळी तयारी पूर्ण झाली आहे राज्य सरकारने नोटिफिकेशन केलेलं आहे बेळगावला येणाऱ्या मंत्री आमदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रहाण्याची जेवणाची सोय करण्यात आली आहे त्यामुळे अधिवेशना बाबत संभ्रम नको असे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी स्पष्ट केलं आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावात अधिवेशन येता शहरात तोची दिवाळी अन् दसरा...
बेळगावात 13 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन होणार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm