बेळगाव : automated driving test track (ADTT)

बेळगाव : automated driving test track (ADTT)

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव सुवर्ण विधानसौधमध्ये येत्या 13 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनाचे औचित्य साधून शहरातील कणबर्गी येथील ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकचे उदघाटन करण्याच्या दृष्टीने सध्या युद्धपातळीवर या automated driving test track (ADTT) चे काम पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. अशाप्रकारे अत्याधुनिक ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक झाल्यास बेळगाव हे राज्यातील अशा प्रकारचा ट्रॅक असणाऱ्या प्रमुख शहरांपैकी एक असणार आहे.
सर्व क्षेत्रांचे आधुनिकीकरण होत असून त्या अनुषंगाने प्रगत देशांमध्ये आता वाहन चालन चाचणी अर्थात ADTT देखील आधुनिक पद्धतीने घेतली जात आहे. यासाठी ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकचा अवलंब केला जात आहे. बेळगाव येथेही हा ट्रेक उभारण्यात येत आहे. यासाठी सदर ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गेल्या तीन-चार वर्षापासून सदर अत्याधुनिक ट्रॅक व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असून सरकारकडून या प्रकल्पासाठी निधी देखील मंजूर झाला आहे. या अत्याधुनिक ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकमुळे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे वाहन चालक परवाना देण्यापूर्वी प्रत्यक्ष मैदानावर उपस्थित वाहनचालकांची चाचणी घेण्याचे श्रम वाचणार आहेत.
भूमिगत कॅमेरे व सेन्सर बसविण्यात येत असल्यामुळे वाहनधारकांची वाहन चालविण्याची चांचणी घेताना अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष ट्रॅकवर उपस्थित राहण्याची गरज भासणार नाही. ते आपल्या कार्यालयात बसल्याजागी ड्रायव्हिंगचे ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहू शकणार आहेत. वाहन चालक परवाना मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवाराने टेस्ट ड्राईव्हच्या वेळी या ट्रॅकवर एखादी चूक केल्यास सेंसरद्वारे बीपच्या स्वरूपात अधिकार्‍यांना त्याची माहिती मिळणार आहे. वाहनचालकाने कोठे कोठे चुका केल्या याची माहिती भूमिगत कॅमेरातील चित्रीकरणासह संग्रहित केली जाणार असल्यामुळे अधिकाऱ्यांना एखाद्याला वाहनचालक परवाना द्यायचा की नाही? हे ठरविणे अत्यंत सुलभ जाणार आहे. याखेरीज वाहन चालक परवाना देण्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट घेणाऱ्या अधिकाऱ्यांना यापूर्वी ड्रायव्हिंग टेस्टच्या ठिकाणी मैदानावर दिवसभर थांबावे लागत होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : automated driving test track (ADTT)

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm