कर्नाटक : सुरुवातीला बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर शाई फेक झाल्यानंतर काही दिवसांनी चित्रदुर्ग येथे भगवा ध्वज जाळण्यात आला होता. त्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराज्याच्या अश्वारूढ मूर्तीवर शाईफेक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
belgavkar - बेळगावकर - belgavkar.com
छत्रपती शिवाजी महाराज यांचा केलेला अपमान देश अजिबात सहन करणार नाही. ह्याचे पडसाद अख्ख्या महाराष्ट्रभर बघायला मिळतील असा मेसेजही व्हायरल होत आहे. कर्नाटकाची राजधानी बेंगळूर येथील सदाशिवनगरातील (मल्लेश्वरम) हा व्हिडीओ आहे.

- बेळगाव : तरुणाच्या खूनाचा संशय
- बेळगाव : तिघांना अटक; बेळगाव शहर आणि उपनगरांत घरफोड्या
- बेळगाव : वरातीदरम्यान झालेल्या वादाप्रकरणी 8 जणांना अटक;
- बेळगाव : खंजर गल्लीत दोघांना अटक
समाजकंटकांनी गुरुवारी रात्री मूर्तीवर काळा रंग ओतल्याने संतापाची लाट उसळली आहे. काही महिन्यांपासून छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरण्याबरोबरच वेळोवेळी अवमानाचा प्रयत्न कर्नाटकात काही संघटना व समाजकंटकांकडून होत आहे.
'belgavkar.com' ने या व्हिडीओची पुष्टी केली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.