बेळगाव : 3 विकासकामांचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते

बेळगाव : 3 विकासकामांचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघात राबवण्यात आलेल्या विविध विकासकामांचे उदघाटन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात येणार आहे. गेल्या दीड वर्षाच्या काळात पाठपुरावा करून बेळगाव उत्तर विभागात अनेक विकासकामे राबवली आहेत. या विकासकामांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मंगळवारी या तीन वेगवेगळ्या विकासकामांचे लोकार्पण होणार आहे.
सायंकाळी 5.30 वाजता नेहरूनगर येथील माहेश्वरी अंध शाळेसमोरील अंतरराष्ट्रीय सुसज्जित स्टेडियमचे उदघाटन होणार असून सायं. 6 वा. संसदेच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या महापालिकेतील नव्या आयनॉक्स इमारतीचे उदघाटन होणार आहे. सायं. 6.30 वा. कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील बसस्थानकाचे उदघाटन केले जाणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार अनिल बेनके यांनी केले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 3 विकासकामांचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm