बेळगाव : 500 एकरमध्ये फौंड्री पार्क; 100 एकरमध्ये हैड्रोलिक उत्पादन इंडस्ट्रीजची उभारणी

बेळगाव : 500 एकरमध्ये फौंड्री पार्क;
100 एकरमध्ये हैड्रोलिक उत्पादन इंडस्ट्रीजची उभारणी

belgavkar.com | belgaum | belgavkar

उद्यमबागमध्ये ईएसआय हॉस्पिटलही

बेळगाव : बेळगाव 500 एकरमध्ये फौंड्री पार्कची उभारणी करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले. उद्यमबागमध्ये ईएसआयच्या हॉस्पिटलचीही उभारणी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगीतले. उद्योजकांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्यानंतर त्या सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करेल , असे आश्वासन मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिले. बेळगावचा औद्योगिक विकास करण्यासाठी 500 एकरमध्ये फौंड्री पार्कची उभारणी करण्यात येईल. यामधील 100 एकरमध्ये हैड्रोलिक उत्पादन इंडस्ट्रीजची उभारणी करण्यात येणार आहे.
कर्नाटक प्रदूषण नियंत्रण बोर्डची रचना बदलण्यात येणार असून, शुल्कही कमी करण्यात येईल. पाण्याच्या बिलासंदर्भात आणि पाणी पुरवठ्याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून ही समस्या दूर करण्यात येईल. उद्यमबागमध्ये ईएसआय हॉस्पिटलची उभारणी करण्यात येणार असून, यासाठी आमदार अभय पाटील यांनी 5 एकर जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्री बोम्मई यांनी केली. अशोकनगरातल ईएसआय हॉस्पिटल पाडून विभागीय हॉस्पिटल बांधण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बेळगाव परिसरारतील उद्योजकांच्या विविध समस्या संदर्भात सुवर्णसौधमधील एका सभागृहात उद्योजकाबरोबर मुख्यमंत्री बोम्मई यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला मध्यम आणि अवजड उद्योगमंत्री मुरगेश निराणी, कामगारमंत्री शिवराम हेब्बार, नगर विकासमंत्री भैरती बसवराज, आमदार अभय पाटील, चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष रोहन जुवळी यांच्यासह विविध उद्योजक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 500 एकरमध्ये फौंड्री पार्क; 100 एकरमध्ये हैड्रोलिक उत्पादन इंडस्ट्रीजची उभारणी
उद्यमबागमध्ये ईएसआय हॉस्पिटलही

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm