बेळगाव : शाळांना 14 ग्रीन बोर्डचे वितरण

बेळगाव : शाळांना 14 ग्रीन बोर्डचे वितरण

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळ च्यावतीने मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या प्रयत्नातून तसेच विधानपरिषद सदस्य श्री साबंना तळवार यांच्या अनुदानातून सुळगा (हिं) व वेळवट्टी मराठी प्राथमिक शाळांना प्रत्येकी 7 (4×10 फूट) असे 14 ग्रीन बोर्ड वितरण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना धनंजय जाधव म्हणाले आपण आर्थिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मजबूत असेल तरच कुणाशीही टक्कर देऊ शकतो.
आपला बेळगाव ग्रामीण भाग विविध कारणाने मागासलेला आहे. भारतीय जनता पार्टी ग्रामीण मंडळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय काम करत आहे. आम्ही 400 ग्रीन बोर्ड देण्याचा संकल्प कामाला सुरुवात केली आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. बेळगाव तालुक्यातील कन्नड आणि मराठी शाळांना याचा लाभ मिळत आहे.
याप्रसंगी सुळगा येथील कार्यक्रमाला शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष मारुती पाटील, ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा सौ. निर्मला कलखांबकर, भाजपा ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्ष भाग्यश्री कोकितकर, महादेव कंग्राळकर, महाशक्ती केंद्रप्रमुख अनिल पाटील, वर्षा सांगावकर, भावकु पाटील, सुरेखा पाटील, जोतिबा पाटील, परशुराम पाटील, यल्लाप्पा चौगुले, मुख्याध्यापिका काजलकर मॅडम बाळू पाटील, येतेश हेबाळकर, आदी उपस्थित होते. तसेच वेळवट्टी येथे भाजपा नेते कल्लापा सुतार, ग्रामपंचायत सदस्य बाबुराव पाटील, बाळू होसुरकर, इराप्पा चांदीलकर महादेवी मेदार, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष गजानन देसाई, उपाध्यक्ष गुंडू सुतार, मुख्याध्यापक नागनुर सर व आदी उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : शाळांना 14 ग्रीन बोर्डचे वितरण

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm