बेळगाव : त्यांचाच आदर्श घेऊन सिंधुताईंना आदरांजली - फेसबुक फ्रेंड्स सर्कल

बेळगाव : त्यांचाच आदर्श घेऊन सिंधुताईंना आदरांजली - फेसबुक फ्रेंड्स सर्कल

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ या नुकताच कालवश झाल्या. त्यांचे समाजकार्य सर्वांनाच प्रेरित करणारे होते. त्यांचाच आदर्श घेऊन अनेक सामाजिक संस्था समाजामध्ये मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यातील अशीच एक संस्था म्हणजे बेळगाव येथील 'फेसबुक फ्रेंड सर्कल'. Facebook Friend Circle अन्नदान, वस्त्रदान, रक्तदान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, पर्यावरण संरक्षण, प्राणी-पक्षी संरक्षण यासारख्या अनेक सामाजिक कामाच्या माध्यमातून समाजातील गरजू लोकांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करीत असते.
सिंधुताई सपकाळ यांना आदरांजली म्हणून नुकताच फेसबुक फ्रेंड्स सर्कलने माईंच्या सन्मती बाल निकेतन (मांजरी, पुणे) अनाथ आश्रमाला तांदूळ, गहू, डाळ, साखर, पोहे इ. जीवनोपयोगी धान्य देऊन माईंच्या कार्याला छोटासा मदतीचा हात देऊन माईंना आदरांजली वाहिली. यावेळी ही मदत फेसबुक फ्रेंड सर्कलचे पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते राजू करजखेडे, संजय जगताप, राजेश मांढरे, राहुल जाधव यांनी आश्रमात जाऊन आश्रमांच्या संचालिका यांच्याकडे अन्नधान्य सुपूर्द केले. या मदतीसाठी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, डॉ. समीर शेख, डॉ.आनंद तोटगी, डॉ. देवदत्त देसाई, कॅन्टोनमेंट प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे, प्रा. भरमा कोलेकर यांचे सहकार्य लाभले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : त्यांचाच आदर्श घेऊन सिंधुताईंना आदरांजली - फेसबुक फ्रेंड्स सर्कल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm