बेळगाव : कर्नाटक लवकरच मंत्रिमंडळ विस्तार; मात्र मुख्यमंत्री बसवराजचं

बेळगाव : कर्नाटक लवकरच मंत्रिमंडळ विस्तार;
मात्र मुख्यमंत्री बसवराजचं

belgavkar.com | belgaum | belgavkar

माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचे स्पष्टीकरण

बेळगाव : कर्नाटक राज्य सरकार मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे खुर्चीवरून पायउतार होतील आणि कर्नाटकाला नवीन मुख्यमंत्री मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, या चर्चेसंदर्भात बोलताना माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी राज्यात मुख्यमंत्री बदल होणार नाही. मुख्यमंत्री खांदेपालट ही केवळ अफवा आहे, असे सांगत चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्यमंत्री बदलासंदर्भात कर्नाटकात चर्चा सुरू आहे. गुढगे दुखीचे कारण पुढे करून मुख्यमंत्री बोम्माई हे पदावरून पायउतार होतील आणि त्याजागी मुरुगेश निराणी येतील, अशी कुजबूज खुद्द भाजप गोटात ऐकावयास मिळत होती. मात्र, यासंदर्भात स्पष्टीकरण देताना माजी मंत्री जारकीहोळी म्हणाले, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि मंत्रिमंडळात अनेक नवे चेहरे दिसतील. पण, मुख्यमंत्रीपदी बसवराज बोम्माईच कायम असतील, असे म्हटले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भात अनेकांची भेट घेऊन चर्चा करण्यात येत आहे. येत्या पंधरवड्यात मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. अमित शहा आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखालीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचेही माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कर्नाटक लवकरच मंत्रिमंडळ विस्तार; मात्र मुख्यमंत्री बसवराजचं
माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचे स्पष्टीकरण

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm