बेळगाव : कुकडोळी क्रॉसनजीक अपघातात मृत्यू

बेळगाव : कुकडोळी क्रॉसनजीक अपघातात मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. खानापूर : खानापूर येथील बीआरसी कार्यालयातील कर्मचार्‍याचा कुकडोळी क्रॉसनजीक दुचाकी अपघातात मृत्यू झाला. जगदीश काद्रोळी (वय 38, रा. एम. के. हुब्बळी, ता. कित्तूर) असे त्याचे नाव आहे. खानापूर सरकारी कन्नड शाळेच्या असलेल्या बीआरसी आवारात कार्यालयात गेल्या 15 वर्षांपासून डाटा ऑपरेटर म्हणून कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते. ते रोज खानापूर एम. के. हुबळी असा दुचाकीवरून प्रवास करत होते.
सायंकाळी काम आटोपून घरी परत जाताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दवाखान्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. जगदीश हे प्रामाणिक व होतकरू कर्मचारी होते. त्यांच्या आकस्मिक जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. जगदीश यांच्या घरची परिस्थिती बेताची आहे. ते कंत्राटी पद्धतीने कामाला असले तरी सर्व शिक्षकांची कामे वेळेत आणि सेवाभावी वृत्तीने करत होते. तालुक्यातील शिक्षक वर्तुळात त्यांनी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते. आई-वडील, पत्नी व मुलांची त्यांच्यावरच सर्वस्वी जबाबदारी होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या कुटुंबाला मदतीचा हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला शिक्षक, तालुक्यातील शिक्षिकांनी प्रतिसाद देत फोन पे, गुगल पे वरून मदत करण्याचे सत्र सुरू ठेवले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कुकडोळी क्रॉसनजीक अपघातात मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm