बेळगाव : इंजीनियरिंग काॅलेजजवळ अपघातात युवक ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : भरधाव दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवक ठार झाला तर मागे बसलेला एकजण जखमी झाला. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मंडळ मराठा इंजीनियरिंग काॅलेजजवळ सोमवारी रात्री हा अपघात झाला. आदित्य सचिन चौगुले (वय 21, मूळ रा. कोल्हापूर, सध्या रा. शिवबसवनगर) असे मृताचे नाव आहे. तर भीमा गाडीवड्डर (वय 32, रा. गँगवाडी ) असे जखमीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, आदित्य हा कोल्हापूरचा रहिवासी आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने तो काही दिवसांपासून शिवबसवनगरमधील आपल्या पाहुण्यांच्या घरी राहायला आला होता. सोमवारी काही कामानिमित्त तो आपल्या मित्रासमवेत कोल्हापूरला गेला होता. काम आटोपून पुन्हा बेळगावकडे येत असताना मराठा मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयानजिक भरधाव दुचाकीवरील ताबा सुटल्याने दोघेही महामार्गावर आदळले. त्यात आदित्य हा गंभीर जखमी झाला. काहींनी दोघांनाही उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरु असताना मंगळवारी आदित्यचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अपघाताची नोंद काकती पोलीस ठाण्यात झाली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : इंजीनियरिंग काॅलेजजवळ अपघातात युवक ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm