बेळगाव : जीवनात राक्षस येतात आणि जातात... पण, सूर्य व चंद्र कायम राहतात

बेळगाव : जीवनात राक्षस येतात आणि जातात... पण, सूर्य व चंद्र कायम राहतात

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि माजी मंत्री आमदार रमेश जारकीहोळी यांच्यातील टिका-टीपणी ही बेळगावकरांसाठी नवी नसली तरी एकमेकांविरोधात विधाने करून जनतेसाठी नवा चर्चेचा विषय बनतो तसेच मनोरजंनही मिळत असते. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर रमेश जारकीहोळी नेहमीच टोलेबाजी करतात. दोन्ही बाजुने परस्परविरोधी विधाने करून राजकीय वर्तुळात हेवेदावे करण्यात येतात. आता पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पुन्हा रमेश जारकीहोळींना डिवचले आहे.
बेळगाव तालुक्यातील माविनकट्टीत एका कार्यक्रमावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कोणाचेही नाव न घेता 'राक्षस' शब्द उच्चारल्याने हा वाद पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यावेळी बोलताना म्हणाल्या, रस्ते कामासाठी दोन वर्षांपूर्वी वर्क ऑर्डर काढली होती. मात्र, तत्कालीन जिल्हा पालकमंत्र्यांनी ग्रामीण मतदारसंघात मंजूर झालेला थांबविला होता. याबाबत संबंधित खात्याच्या अभियंत्यांना माहिती असल्याचेही त्यांनी सांगितले. काहीवेळा सूर्य आणि चंद्रालाही ग्रहण लागते. आमचीही यातून सुटका नाही. जीवनात राक्षस येतात आणि जातात. मात्र, सूर्य व चंद्र आपल्या जागीच राहतात, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : जीवनात राक्षस येतात आणि जातात... पण, सूर्य व चंद्र कायम राहतात

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm