बेळगाव : अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार;
एकाला अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना शनिवार उघडकीस आली आहे. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी परवेज उर्फ राहुल जुबेर शहा (वय 20, रा. उत्तर प्रदेश) या संशयिताला अटक केली आहे. त्याच्यावर POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
28 डिसेंबर 2021 रोजी त्याने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. तो सावगाव येथील एका नर्सरीमध्ये कामाला होता. त्या ठिकाणी संशयित आणि पीडित युवतीशी त्याचा संपर्क आला. यातूनच त्याने अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. त्यामुळे याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून संशयिताला अटक केली. बेळगाव जिल्हा रुग्णालयात संशयिताची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली. पोलीस निरीक्षक सूनिलकुमार नंदेश्वर पुढील तपास करीत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार; एकाला अटक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm