बेळगाव : महामार्गावर काकती येथे अपघातात दोघेजण जखमी

बेळगाव : महामार्गावर काकती येथे अपघातात दोघेजण जखमी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : राष्ट्रीय महामार्गावर काकती येथे समोरून निघालेल्या मालवाहू ट्रकला कारने पाठीमागून दिली. धडक यामध्ये कार मधील दोघेजण जखमी झाले. शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर काकती येथे हा अपघात घडला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मालवाहू ट्रक कोल्हापूर वरून बेळगावकडे येत होता. यावेळी त्याच्या पाठीमागे मुंबईहून गुजरातला कार निघाली होती. चालकाचे नियंत्रण सुटून सावकाश निघालेल्या ट्रकला कारची जोरदार धडक बसली. यामध्ये कारमधील दोघे जण जखमी झाले.
यकीनकुमार मुकुंदभाई पटेल व पार्थ चैतन्य कुमार पटेल (दोघेही रा. गुजरात) हे जखमी झाले. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. काकती पोलिसात नोंद झाली असून उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. तपास करीत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : महामार्गावर काकती येथे अपघातात दोघेजण जखमी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm