बेळगाव : अपघातात शिक्षक जागीच ठार

बेळगाव : अपघातात शिक्षक जागीच ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. अथणी : जत-उमदी सोलापूर मार्गावर वलसंग येथे ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात अथणी तालुक्यातील अनंतपूर येथील कन्नड शाळेतील शिक्षक जागीच ठार झाले. शनिवारी सकाळी हा अपघात झाला. लक्ष्मण बाळू पवार (वय 51, रा. उटगी, ता. जत) असे मयत शिक्षकाचे नाव आहे.
लक्ष्मण पवार हे जत तालुक्यातील आपल्या उटगी गावात वास्तव्यास होते. शनिवारी सकाळची शाळा असल्याने ते अनंतपूरकडे निघाले होते. वलसंगजवळ आल्यावर ट्रॅक्टरने मागून त्यांच्या दुचाकीला जोराने धडक मारली. त्यात पवार हे जागीच ठार झाले. जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : अपघातात शिक्षक जागीच ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm