बेळगाव : विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : मुतगा (ता. बेळगाव) येथे विवाहितेने आत्महत्या केल्याची नोंद मारीहाळ पोलिसांत झाली आहे. भावना प्रशांत पाटील (वय 22, रा. मुतगा) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पतीसह सासू-सासऱ्याविरोधात मृत महिलेच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भावना ही मूळची खानापूर तालुक्यातील बरगाव येथील आहे.
दोन वर्षांपूर्वी तिचे प्रशांत पाटील याच्याशी लग्न झाले आहे. लग्नानंतर काही दिवस व्यवस्थित होते. शिवाय सध्या प्रशांत पाटील हा दुबईला कामाला गेला आहे. घरी सासू-सासरे व भावना तिघेच राहतात. शनिवारी रात्री भावनाने राहत्या घरी गळफास घेतला. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. मृत महिलेच्या वडिलांनी आपल्या मुलीने छळामुळे आत्महत्या केल्याची फिर्याद मारीहाळ पोलिसांत दिली आहे. त्यानुसार सासरे भावकाण्णा शिवाजी पाटील, सासू प्रभावती व पती प्रशांत या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक महांतेश बसापुरे तपास करीत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm